संजय राऊत विद्वान, ते काहीही बोलू शकतात; चंद्रकांतदादांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती वरून कोर्टाने राज्यपालांचे कान टोचल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधला होता. राज्यपाल आमचा अपमान करत आहेत असं संजय राऊत यांनी म्हंटल होत.

संजय राऊत यांच्या या विधानाबाबत आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत टोला लगावला आहे. ‘संजय राऊत काहीही बोलू शकतात, ते फारच मोठे विद्वान आहेत. हे प्रकरण कोर्टात आहे. त्यावर मी बोलू शकणार नाही,’ असं पाटील म्हणाले.

तसंच काल डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुनही विरोधक मोदींवर टीका करत आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की राजकारणाची पातळी खालावली आहे. या देशात काही परंपरा आहेत. एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करायची योग्य नाही. पण मोदींना त्याने काही फरक पडत नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment