मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार, काही जण सुपात तर काही जण जात्यात; चंद्रकांतदादांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आज त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले होते मात्र ते हजर न राहिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलाय.