हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली येथील एका कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोश्यारी यांनी उत्तराखंडला परत जाण्याचं मिश्किल भाष्य केलं होतं. त्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात सहभागी होणार का अशी चर्चा रंगली होती. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही तर एक छोटा कार्यकर्ता आहे. भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार की नाही माहिती नाही. पण भाजपमध्ये 75 वर्षानंतर कोणतेही नेते निवडणुकीत सक्रिय नसतात हा अलिखित नियम असल्याचं पाटील म्हणाले आहेत.
भगतसिंह कोश्यारी नेमंक काय म्हणाले ?
“नेहमी अतिवृष्टी पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती नेहमी असायची. पण मी राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय. अतिवृष्टी होत आहे. जर हे जंयत पाटील यांना वटत असेल तर मी लवकरात लवकर हे सोडून निघून जाईल. असंच तर नुकसान झालं नसेल ना जंयत साहेब ?” असे कोश्यारी म्हणाले.