राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय दहशतवादी संघटना आहे का? चंद्रकांतदादांचा बोचरा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख प्रकरणानंतर गृहखात्याची जबाबदारी स्वीकारल्या नंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांची संघनिष्ठा तपासण्या बाबत वक्तव्य केले होते. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वळसे पाटलांवर निशाणा साधताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? असा बोचरा सवाल केला आहे.

गांधीजींच्या हत्येनंतर देखील सगळ्या कोर्टाने निर्णय दिला की गांधीजींच्या हत्येशी संघाचा कोणताही हात नाही. त्यावेळी तर तुमचेच सरकार होते. तसेच देशामध्ये करोना हे तर आतांच उदाहरण आहे. त्याशिवाय सगळ्या आक्रमणांमध्ये, अडचणींमध्ये समाजासाठी कोण धावून आलं. सगळ्या विषयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशासाठी, समाजासाठी झिजला,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राजकीय आवश्यकतेपोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यात आणू नका. तुम्ही हे म्हणा की यातले कोण अधिकारी विरोधी पक्षाला माहिती पुरवतात. आता तुमची प्रशासनावर पकड नाही त्याला आम्ही काय करणार, पण पण त्याला संघाचं लेबल लावू नका आणि संघाचे शोधून तुम्ही काढताय, कायदा संपला आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही टोकाची राष्ट्रावर श्रद्धा असणारी समजावार प्रेम असणारी संघटना आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group