मुंबईवर दिल्लीचंही लक्ष; चंद्रकांत पाटलांनी उघड केली भाजपची पुढील रणनीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून राज्यातील अन्य निवडणुकांप्रमाणेच, मुंबई महापालिका (BMC) हे भारतीय जनता पक्षाचं नव्या वर्षातलं लक्ष्य आहे. आणि यावेळी थेट दिल्लीहून मुंबईवर लक्ष दिलं जाईल,’ असं सांगत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपची पुढची रणनीती उघड केली.

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘मुंबई महापालिका ही काही जणांची जहागीर झाली आहे. अनेक राज्यकर्त्यांनी त्या-त्या वेळेला मुंबई यांना राहू दे, असं म्हणून महापालिकेकडं दुर्लक्ष केलं. मग मुंबई महापालिकेच्या सत्तेतून पैसा मिळवून राजकारण करत करत हे मजबूत झाले. या सगळ्यामध्ये मुंबईकरांच्या समस्या बाजूलाच राहिल्या आणि यांचं राजकारण मजबूत होत गेलं.अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल .

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, भाजपची संघटना मजबूत करणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. करोनाच्या काळात प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. ती उणीव यावर्षी भरून काढली जाईल. येत्या १५ जानेवारीला साडे चौदा हजार ग्रामपंचायती, त्यानंतर ९२ नगरपालिका, ५ महापालिका व जिल्हापरिषदांच्याही निवडणुकात आहे. त्यात जास्तीत जास्त यश मिळवणं हा आमचा प्रयत्न राहील,’ असं पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment