अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार 80 तासांत पडलं नसत – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाडप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले, त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते, असा घणाघातही चंद्रकांतदादांनी अजित पवारांवर केला. ते टिकवले असते तर सरकार राहिले असतं. तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय. मग का आमच्या लोकांना आकर्षित करता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अजितदादा खूप ‌चांगले नेते, चांगलं काम करतात. गंमत निर्माण होईल, असं बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.

दरम्यान, निवडणूक संपल्यावर पाच वर्ष एकत्र काम करावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.  मात्र गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातं असल्याचं म्हणत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment