संजय राठोड अजूनही मंत्रिपदावर ?? ; मुख्यमंत्र्यांना वाण नाही पण गुण लागला ; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर अखेर त्यांना आपला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तो अद्याप राज्यपालांकडे पोचवला नाही असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

“मा. मुख्यमंत्रीजी, संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन 3 दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आजही मंत्री आहेत. ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं आहे. या संदर्भात “वाण नाही पण गुण लागला” हे तुमच्याबाबत होऊ देऊ नका” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलंय.

दरम्यान याच मुद्द्यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल संजय कुटे यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like