हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यातील पक्षाने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. कशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठी खेळी खेळली आहे. कारण की, आता लवकरच येथील भाजपचे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे आता भाजपाला आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सात जुलै रोजी भाजपाचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपच्या मंत्री अतुल सावे यांना आणि शिवसेनेच्या आमदार संजय शिरसाठ यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे, ठाकरे गटात सहभागी होणाऱ्यांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. एकाने नगरसेवक आले तर विधानसभा निवडणूक लढवली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये 6 ते 8 माजी नगरसेवक, 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत संमती सदस्य, 1 तालूका अध्यक्ष, 1 युवा मोर्चा अध्यक्ष , 5 मंडळ अध्यक्ष यांचा समावेश आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मोठा डाव टाकल्याचे म्हणले जात आहे. तसेच, हे सर्व महत्त्वाचे व्यक्ती उद्धव ठाकरे गटात आल्यानंतर याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला होईल, असेही म्हणले जात आहे.