हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढत्या वीज बिला वरून गोंधळ सुरू आहे. वीजबिल माफी वरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरूनच आता राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.निव्वळ पोकळ घोषणा करायच्या आणि दुसरीकडे जनतेची दिशाभूल करायची. हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कुणीही मागणी केली नसताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. यावर त्यांच्याच सरकारमधील इतर मंत्र्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. नंतर कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिलात सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. असे फडणवीस म्हणाले
त्यानंतर दोन हजार कोटीपर्यंत माफी देण्याची घोषणा केली. आता महावितरणला नुकसान असल्याचे सांगून सवलत देता येणार नाही असे जाहीर केले. महाआघाडीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. एक मंत्री घोषणा करतो दुसरा नकार देतो असा प्रकार सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’