हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या मागणीवर देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत, असं म्हणत फडणवीसांनी भुजबळांना उत्तर दिलं आहे.
तसेच जनगणना होणार असल्याने अधिक वेळ न दवडता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी विधानसभा अध्यक्षांकडे यावेळी केली. आम्हाला या विषयाबद्दल आधी कळवलं असतं तर आम्ही अधिक माहिती घेतली असती.
आम्हाला विश्वासात घेतलं असतं बरं झालं असतं. भुजबळ यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचं त्यांना समर्थनच आहे. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम राबवताना जनगणना माहिती असेल तर धोरण आखण्यास मदत होते. असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.