हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती.
त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, रशिया, अमेरिकेत काय झालं ते बोलता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं. पण वास्तवात एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही, असे फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’