हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या शक्यतेबद्दल चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यामुळे मनसे- भाजप युतीची शक्यता वाढली आहे. परंतु अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात तरी कुणी कुणाला भेटण्यावर तरी बंधनं नाहीत. राजकारणामध्ये जर आणि तरला महत्त्व नसते. राज ठाकरेंची हिंदुत्त्वाची भूमिका हा निश्चितच आमच्यातील महत्त्वाचा धागा आहे पण राज ठाकरे यांच्या पक्षात आणि भाजप मध्ये फरक हाच आहे कि परप्रांतीयांच्या त्यांच्या भूमिकेबद्दल आम्ही सहमत नाही असे फडणवीसांनी म्हंटल.
त्यामुळे या मुद्द्यांवर जिथपर्यंत निराकारण होत नाही, तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही.”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.राज ठाकरे आणि आमची भेट होणं स्वाभाविक आहे पण याचा राजकीय अर्थ काढू नये असेही फडणवीसांनी म्हंटल.