कंगणाची शेतकरी आंदोलनावर टीका, भाजपचा मात्र No Support; पक्षाने झटकले हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना राणावतने (Kangana Ranaut) केला होता. तिच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं तसेच विरोधकांनी सुद्धा समाचार घेतला. यानंतर आता भाजपने कंगनाच्या विधानावर आपले हात झटकले आहेत. कंगना राणावत जे काही बोलल्या त्याला पक्ष म्हणून भाजपचे समर्थन नाही असं भूमिका पक्षाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र सुद्धा भाजपने प्रसिद्ध केलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (Bhartiy Janata Party) केंद्रीय माध्यम विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हंटल आहे कि, भाजप खासदार कंगना राणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणौत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाकडून असहमती व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाच्या वतीने, कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही. आता थेट भाजपनेच कंगनाच्या विधानानंतर हात वर केल्यानंतर आता ती काय प्रतिक्रिया देते ते पाहायला हवं. कंगना तिचे विधान मागे घेते कि आपल्या विधानावर ठाम राहते ते आता पाहायला हवं.

कंगना काय म्हणाली होती?

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत धक्कादायक विधान केलं होते. मागच्या वर्षीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी अनेक बलात्कार झालेत, हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या. आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार सुरु होता, अनेकांवर त्यावेळी बलात्कार झाले तसेच अनेकांच्या हत्याही करण्यात आल्या होत्या असा आरोप कंगणा राणावतने केला होता.