हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य दसरा मेळाव्यात केले होते. यासंदर्भात यवतमाळ येथे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा तक्रार दाखल करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राणेंच्या वक्तव्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र्भर उमटले. अनेक ठिकाणी शिवसैनिकां कडून दगडफेक, राडा करत निषेध नोंदविण्यात आला. तर दुसरीकडे राणेंच्या जामिनासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले केले.
शेवटी दिवसभराच्या हालचालीनानंतर मंगळवारी रात्री उशिरा मंत्री राणेंना जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.