उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनाने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथं मागील १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळं जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हरिभाऊ जावळे यांची राजकीय कारकीर्द
हरिभाऊ जावळे हे पहिल्यांदा १९९९ साली जळगावातील रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जळगाव मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरच्या २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी ही जागा राखली होती. २०१४ साली त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, पक्षानं ऐनवेळी निर्णय बदलून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जावळे यांना संधी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा मोठ्या फरकानं पराभव करत विधानसभेत प्रवेश केला होता. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment