दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? भाजपचा खोचक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधकांकडून सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर १५ ऑगस्ट पासून २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. यानंतर देखील भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. २ डोस घेतले असतील तर मुख्यमंत्री आता तरी मंत्रालयात जाणार का कि अजूनही वर्क फ्रॉम होम करणार असा सवाल त्यांनी केला.

दोन डोस घेतलेले सर्वसामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करतील पण दोन डोस झाले असतील तर मुख्यमंत्री आता मंत्रालयात जाणार का? गर्दी टाळण्यासाठी तसही तुम्ही स्वत:च मर्सिडीझ चालवत असल्याने बारकोड स्कॅनिंगचाही अडथळा नाही. दोन डोस झालेल्यांना जे नियम, ते स्वत:ही अमलात आणणार की अजूनही वर्क फ्रॉम होम करणार” असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री मंत्रालयात न जात घरात राहून काम करतात अशी टीका गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील काल उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन करू असा टोला त्यांनी लगावला होता.