हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपची तुलना वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरासारखी केल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनीही शिवसेनेवर पलटवार केला आहे. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल अशी टीका केशव उपाध्येय यांनी केली
स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत सामील झाल्यानं हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मा. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही हे वारंवार दाखवून दिलं.
स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत सामील झाल्यानं हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मा. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही हे वारंवार दाखवून दिलं. pic.twitter.com/VVLfq51ufP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 15, 2021
देशात लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य उरलंय का? असा म्हणता, ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच तुम्ही अग्रलेख लिहिताय. तुमच्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांना मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण केली जाते.
देशात लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य उरलंय का? असा म्हणता, ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच तुम्ही अग्रलेख लिहिताय. तुमच्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांना मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण केली जाते. ..1/2 pic.twitter.com/iMAETz7laJ
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 15, 2021
महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होत नाही म्हणून रिक्षाचालकांना मारहाण, दुकानदारांना शिवीगाळ केली जाते. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल अशी टीका केशव उपाध्येय यांनी केली .
महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होत नाही म्हणून रिक्षाचालकांना मारहाण, दुकानदारांना शिवीगाळ केली जाते. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल 2/2
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 15, 2021
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे अशा शब्दांत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भारतीय जनता पक्षाचा बुरखाच फाटला आहे. शिवसेनेचे विचार व शिवसेनेच्या भीतीने ते भुई थोपटत सुटले आहेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.