हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करून ते नेमके कोठे जाते याची माहिती कळत नाही,असली थोतांडे मला करता येत नाहीत अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथील पूरग्रस्तांना धीर दिला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला.
केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की ,म्हणजे असं झालं की लोकांना मदत केली, पॅकेज घोषित केले की त्यातील पैशातून सरकारमधीलच वसुली होते याची प्रामाणिक कबुली दिली आहे का ? पूरग्रस्तांचा पॅकेज मध्येही वाजे? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की ‘घड्याळा’ची वेळ चुकलीय?
म्हणजे असं झालं की लोकांना मदत केली, पॅकेज घोषित केले की त्यातील पैशातून सरकारमधीलच वसुली होते याची प्रामाणिक कबुली दिली आहे का @OfficeofUT ? पूरग्रस्तांचा पॅकेज मध्येही वाजे? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की 'घड्याळा'ची वेळ चुकलीय? https://t.co/5ULxjCy3MS
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 2, 2021
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले-
हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करून ते नेमके कोठे जाते याची माहिती कळत नाही,असली थोतांडे मला करता येत नाहीत. कृष्णाकाठच्या पूरग्रस्तांसाठी जे जे करता येईल ते ते प्रामाणिकपणे मी करेन हे माझे जनतेला वचन आहे. तुम्ही सरकारला साथ द्या. आपण कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा काढू असे उद्धव ठाकरे यांनी सांगली येथे म्हंटल