वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री; भाजपची बोचरी टीका

0
64
keshav upadhey uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकादशीच्या महापूजेसाठी मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भर पावसात मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन  भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

दरम्यान, राज्यातील खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे निघाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here