भाजपने खडसे-तावडेंचा ‘विनोद’ केला – धनंजय मुंडे

0
37
संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । आशिष शेलार यांनी काल जितेंद्र आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या निघालेल्या रॅलीवर टिकास्र सोडले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेलार यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी आव्हाडांसाठी भर उन्हात रॅलीत सहभाग घेतला होता. रॅलीतील शरद पवार यांच्या उपस्थिती संधर्भात आव्हाडांना प्रश्न विचारल्यावर ते भावुक झाले होते. पक्षाध्यक्ष पवार यांनी आपल्या साठी न थकता पूर्ण वेळ रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला हा माझ्या साठी खूप खास दिवस आहे, असे त्यांनी म्हंटले होते.

यावर शेलार यांनी टिका केली होती, “नागपूरने देवेंद्रजी.. कोथरूड मधून दादा… वरळीतून आदित्यजी.. परळीतून पंकजाताई… बारामतीतून पडळकर व कसबामधून मुक्ताताई टिळक… महायुतीची किती नावे घ्यावीत? कुठेच उरली नाही तुल्यबळ लढत! अर्ज भरण्यास “साहेब” मुंब्र्यात आले… एक उमेदवार भावूक झाले.. आता असेच बसा रडत!” . आव्हाड यांच्या भावुक होण्यावर “आता असेच बसा रडत” अशी टिका शेलार यांनी केली होती.

यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, “बारामतीच्या साहेबांचं बोट धरून मोठा झाला.. दिवसाढवळ्या पदांसाठी त्याच साहेबांच्या पाया पडून निवडून आला… अन् ऋण विसरला … अर्धी खुर्ची मिळताच दीड शहाणा झाला… भाऊ, ही भाजप आहे ! खडसे-तावडेंचा ‘विनोद’ याच भाजपने केला कुणी सांगा हो यांना!”. मुंडे यांनी शेलार यांच्या टिकेला उत्तर दिलेे व भाजप नेतृत्त्व कसं निष्ठावंतांना फसवत आहे, त्यामुळे तुमच्यावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी शेलार व अन्य भाजप नेत्यांना लगावाला.





LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here