हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता आपला मोर्चा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्याकडे वळवला असून खोतकरांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे..साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयांची जमीनही बळकविण्याचा खोतकर यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय. अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे. मुळे आणि तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या, असा दावा सोमय्या यांनी केलाय.
अर्जुन खोतकर यांची 100 कोटीचा कारखाना आणि 1 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचं सोमय्या म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे सक्तवसुली संचालनालय ( ईडी ), प्राप्तिकर विभाग, राज्य व केंद्राच्या सहकार विभागाकडे दिले असून, या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. असे सोमय्या यांनी म्हंटल.