हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळवला असून सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंगले पाहणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात
किरीट सोमय्या म्हणाले, मी पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. तर 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळीही मला रोखणार आहे का?, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.
घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रिफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमैय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमैय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.