दाऊदला जरी पाठवलं तरी मी भीत नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत’, असा गंभीर आरोप करत मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले. अगदी दाउदला जरी पाठवले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.

मी शिवसेना आणि ठाकरे सरकारला सांगतो, तुम्ही कितीही गुंडांना, भाईला आणि दाऊदला जरी पाठवलं तरी मी भीत नाही. तरी मी तुमचे घोटाळे उघडकीस आणणार. आम्ही कुणाला भीत नाही. आम्ही महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला जबाबदार आहोत, किरीट सोमय्या यांनी म्हंटल.

दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 21 पक्ष आणि 21 नेते समोर येत आहेत. मग ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, राहुल गांधी असो या सोनिया गांधी. पण हे 21 लोक एक होऊन मोदी होऊ शकत नाही,’ असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे