हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील नेत्यांवर भाजपमधील नेत्यांकडून टीका केली जात आहे. असा दरम्यान आज एका कार्यक्रमात भाजप नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “आम्ही कोणीही हे सरकार पडणार असे म्हंटलेले नाही. या सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. पोलाही फुटणार आहे. अशी टीका करीत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा लोणीकर यांनी केला आहे.
भाजप नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी माध्यमंही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही पहिल्यापासून म्हणत आलेलो आहोत की, “महाविकास आघाडी सरकार हे पडणार नाही. या आघाडीतील शिवसेनेचे बारा आमदार नाराज आहेत. आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत. या सरकारने आतापर्यंत केलेल्या पापांचा घडा हा आता भरलेला आहे.”
महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या असलेले अनेक आमदार हे नाराज आहेत. सध्या शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे झाले तर या पक्षातील बारा मदार आहेत हेही सध्या नाराज आहेत. ते भाजपच्या संपर्कात आहेत. मटार, हे सरकार पाडणार असल्याचे आम्ही कोठेही बोललेलो नसल्याचे लोणीकर यांनी यावेळी सागितले.