हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी दारुण प्रभाव केला. यावरून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज्यात धोका देऊन सरकार बनवल्याने सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. लोकांचा आता शिवसेनेवर विश्वास राहिलेला नाही, अशी टीका दानवे यांनी केली आहे.
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. आमचे उमेदवार वसंत खंडेलवाल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला आहे. आम्ही सांगत होतो कि आमच्याबरोबर राहा. मात्र, शिवसेनेने दुसऱ्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
आता भाजप हा महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. आताच्याच निवडणुकीत जनतेने शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. आता महापालिका निवडणुकीत ते काय करणार? त्यांना आपल्या पराभवाचे आताच त्यांना उत्तर मिळाले आहे, असे दानवे यांनी म्हंटले.