स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार? रविकांत तूपकर यांना भाजपच्या बड्या नेत्याकडून खूली ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यात अंतर्गत वाद सुरू असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यानंतर रविकांत तूपकर देखील बंड करण्याच्या तयारीत असल्याचे म्हणले जात आहे. अशी सर्व परिस्थिती निर्माण झाली असतानाच, रविकांत तुपकर यांना भाजपकडून (BJP) खुली ऑफर देण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं अशी ऑफर भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिली आहे.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष देशमुख यांनी म्हंटल, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकरी हितासाठी कमालीचे कामं करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. संघटनेत सुरू असलेल्या अंतर्गत वादावर तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा” अशी खुली ऑफर देशमुखांनी तुपकर यांना दिली आहे. आता या ऑफरवर तुपकर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमची कार्यकर्त्यांचीच असल्याचा मोठा दावा रविकांत तुपकर यांनी केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजू शेट्टी यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यानंतर तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे वाद चव्हाट्यावर आल्यानंतर तुपकर यांनी देखील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यातूनच आता स्वाभिमानी संघटनेत फूट पडेल की काय अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुख्य म्हणजे, रविकांत तुपकर यांनीही संघटनेतील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त करत, आपले नेतृत्व संघटनेत दाबले जात असल्याचा प्रयत्न होत आहे असा दावा केला आहे. तसेच, आमच्या सोबत केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे, असाही आरोप त्यांनी केला होता. आता हे वाद विवाद सुरू असतानाच भाजपकडून तुपकर यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. तर तुपकर देखील भाजपची ही ऑफर्स स्वीकारतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे सध्या तुपकर नेमकी काय भूमिका घेतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.