हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकपसाठी ते रुग्णालयात डॉक्टरांना भेटले आहेत. या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीची डॉकटर तपासणी करत आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यानंतर त्यांना पोलिसांकडून अटकही करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनि डॉक्तरांकडून तपासणीही केली होती. यानंतर त्यांची तब्बेत ठीक झाली. दरम्यान त्यांच्यावर दाखल झालेल्या गुह्यांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा शिवसेना, मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, मंत्री राणेंनी भाजपची अर्धवट ठेवलेली जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. राणेंना दोन दिवसापूर्वीच त्रास जाणवत होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दरम्यान, ते आज लीलावती रुग्णालयात रुटीन चेकापसाठी दाखल झाले आहेत. या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीची डॉकटर तपासणी करत आहेत. त्यांच्या तपासणीनंतर ते उद्यापासून सुरु होणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेसाठी हजेरी लावणार आहेत.