हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली.
मला जर विचारालं तर सांगेन सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे यांना बोलुन काहीच फायदा नाही कारण ते बाहेर फिरतच नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटायला सांगितलं असावं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोक भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले , तसेच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाच्या प्रश्नी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसंच, राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी सांगितले, यावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’