सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
विरोधक वेळोवेळी भाजपवर छत्रपतींचा अपमान होत असल्याचे आरोप करता असतात. विरोधक बोलत राहतील त्यांच्या गोष्टी फार काय मनावर घेऊ नये, ते सध्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एकजण तर 103 दिवस तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याने ते वाट्टेल ते बोलत आहेत, अशी टीका भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात मुलींचा नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या कि, सगळ्यांचा मान सन्मान भाजप वेळोवेळी करत आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये छत्रपती घराण्याचा आदर राखला जात नाही असे कुणी म्हणू नये.
103 दिवस तुरुंगात गेल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; चित्रा वाघ यांची नाव न घेता राऊतांवर टिका pic.twitter.com/tsXWwPcpkG
— santosh gurav (@santosh29590931) March 8, 2023
70 हून अधिक मुलींचा नामकरण सोहळा
साताऱ्यात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप महिला मोर्चाच्या वतीने ७० हून अधिक मुलींच्या नामकरण सोहळ्याचे राधिका संकुलात आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांसोबत नामकरण सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते हळदी-कुंकू व वाणवाटप सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.