हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मुंबईतील कुर्ला येथे एका 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. HDIL कंपाउंडमधल्या बंद इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करीत महाविकास सरकावर निशाणा साधला आहे. “राज्यातील आघाडी सरकारला महिलांच्या सुरक्षेपेक्षा नाईट लाईटची जास्त काळजी आहे. तेवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही?, अशी टीका वाघ यांनी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राज्य सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मुंबई कुर्ला इथं तरूणीवर बलात्कार करून हत्या झालीये…तिचा मृतदेह अजूनही बेवारस पडून आहे. कुर्ला येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे ही घटना धक्कादायक आहे. राज्य सरकारने साकीनाका प्रकरण झाल्यानंतर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं होतं. मुंबई पोलिसांनी अकरा कलमी कार्यक्रम आहे जाहीर केला होता, त्याचं काय झालं? निर्जन ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी, लाइटची व्यवस्था करावी अशा सूचना केल्या होत्या. मग तरीही कुर्ल्यामध्ये महिलेवर अत्याचार कसा होतो?”
मुंबई कुर्ला इथं तरूणीवर बलात्कार करून हत्या झालीये…तिचा मृतदेह अजूनही बेवारस पडून आहे…
मुंबईच्या खड्यासारखीच राज्यातील कायदा सुव्यवस्था पण खड्ड्यात गेलीय..@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @maharashtra_hmo @MumbaiPolice @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/CELl8PoCRs
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 27, 2021
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ओळखली जाणारी मुंबई आता ‘जंगलराज’च्या वाटेवर आहे… राज्यातील सरकारला जेवढी काळजी मुंबईच्या नाईट लाईफची आहे तेवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही? मुंबईतल्या खड्ड्यांप्रमाणे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही खड्ड्यात गेली आहे, अशी टीका वाघ यांनी केली आहे.