हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळाचे सत्र अजूनही सुरु आहे. या दरम्यान आरोग्य विभाग गट डच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहले आहे. “पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे. परफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी, असा टोला वाघ यांनी ठाकरेंना पत्रातून लगावला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहले. त्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. टिट्वीटमध्ये म्हंटले आहे की, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेजी खरंतर तुम्हाला पत्र लिहून विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याची गरज नव्हती. परंतु तुमच्या वडीलानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्या शिवाय कोणाची चिंता नाही. तुमच्या शिवाय कोणाच ऐकत नाहीत म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते आहे.
वास्तविक मुलाच्या भवितव्यासाठी वडित किती करतात हे तुम्हाला वागतच माहिती आहे. तुमचे वडीत स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रत्र आल्यावर मात्र ते गप्प बसलेत तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून मी सातत्याने आरोग्य विभागाच्या परिक्षेतीत गोंधळ निदर्शनास आणून दिला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
श्री. आदित्य ठाकरे जी यांना पत्र.
पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे…
पेपरफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे…@AUThackeray जी,
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी… pic.twitter.com/2yHC3Tb38q— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 1, 2021
राज्यातील जनतेचे असख्य विद्यार्थ्याचे पालक आहेत. हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो. असो. आज पाचव्यादा आरोग्य विभागाचा पेपर फुटता आहे. यावर माझे काही प्रश्न आहेत. १) न्यासा एजन्सीची चौकशी का लावती नाही? २)एजन्सीच्या लिस्ट मध्ये प्रश्न का काढले नाही? ३) एजन्सीचा परिक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले? ४) एमपीएससीसारखी विश्वासार्ह संस्था असताना न्यासा एजन्सी का निवडली? या प्रभावी उत्तरे सरकारने यादी. खरतर द्यायला हवी. तिन्ही पक्षात काही सालोट झालय का? याचा संशय येतोय आपण राज्यभरातील प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवावेत.