जगाला ‘तालिबान’ पासून अन् महाराष्ट्राला ‘धनुष्यबाण’ पासून खरा धोका

0
118
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणे यांच्या कारवाई करण्यात आली. यावर भाजप नेते राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका असल्याचं ट्विट केले.

नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी हातावर घडी, तोंडावर बोट अशी भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर जसे संस्कार आहेत ते तसे बोलणार असे म्हणत मी राणेंवर बोलावे इतके मी त्यांना महत्वाचे समजत नाही अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राणजगजीत सिंह पाटील यांनी केलेले ट्विट विशेष चर्चेत आहे. जगाला ‘तालिबान’ पासून आणि महाराष्ट्राला ‘धनुष्यबाण’ पासून खरा धोका आहे अशा आशयाचे ट्विट पाटील यांनी केले आहे. शिवसेनेची तुलना तालिबानशी केल्याने पाटील यांच्यावर शिवसैनिकांकडून टिका होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here