हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सहा महिन्यांपूर्वी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना हे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यानंतर सरकार काय असते, याची जाणीव जनतेला व्हायला लागली. मागील अडीच वर्षांचे सरकार बंदीस्त होते. दाराआड होते. तसेच हे सरकार फेसबुक लाईव्हवर होते. मात्र, त्या सरकारमध्ये केवळ वसुली दिसत होती. अडीच वर्षाचे सरकार बंदिस्त असूनही त्यांनी वसुलीचा उच्चांक गाठला, तसे मंत्रीही वर्क फ्रॉम जेल होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, गेल्या अडीच वर्षामध्ये या सरकारमधील मंत्र्यांपासून सर्वच तुरूंगात दिसले. वर्क फ्रॉम होम आपण पाहिलं होते. पण वर्क फ्रॉम जेल हा नवीन प्रकार आपल्याला अडीच वर्षात बघायला मिळाला.
कारण तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत आणि नैतिकता नव्हती की, जेलमधल्या मंत्र्याचा ते राजीनामा घेतील. शेवटी काय झालं, सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले आणि तेव्हाच त्यांचा कारभार बंद झाला, असे फडणवीस यांनी म्हंटले.