सोलापूर । गेल्या वर्षी अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना अजित पवार यांना हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भल्या पहाटे शपथविधी उरकला होता. मात्र, अजित पवारांचे हे बंड काही तासांतच शमवण्यास शरद पवार यांना यश आले. फडणवीसांचा प्रयन्त अपयशी ठरला अन त्यांचे सरकार अल्पजीवी ठरले. त्यांच्या सत्तास्थापनेच्या या अयशस्वी प्रयोगाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पुन्हा एकदा पंढरपुरात प्रसारमाध्यमांकडून तुम्ही पुन्हा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत शपथ घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी काळजी करु नका, आता फक्त भाजपचेच सरकार येईल, असे उत्तर दिले. (Devendra Fadnavis take a dig at Sanjay Raut over Love Jihad)
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पंढरपुरात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारने वीज बिल माफीच्या आश्वासनावरून घुमजाव केले. एकाही समाजातील घटकाला लॉकडाऊनच्या काळात सरकारने फुटकी कवडीही दिली नाही. लोकांना कर्मयोगी आवडतात, बोलघेवडे लोक आवडत नाही, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार हे माहितीचं नव्हतं! सरकार स्थापनेच्या 'त्या' विधानावर शरद पवारांचा टोला
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/mvGcizf2QW@raosahebdanve @PawarSpeaks @NCPspeaks #HelloMaharashtra @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/gwD47XIyJY@ChDadaPatil @BJP4Maharashtra @INCMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
'मी आलोय, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे साहेब! जयसिंग गायकवाडांनी दिले भाजपमधील आऊटगोइंगचे संकेत
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/h3jKSZKM5V#jaysinghraogaikwad @NCPspeaks @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’