“ना डरेंगे, ना दबेंगे”; केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेनंतर फडणवीसांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत मंत्री राणेंवर अटक करण्याचे आदेश पोलिसांनी काढले. त्यानुसार राणेंनी कोर्टाने जामीन मागितला असता कोर्टानेही जामीन फेटाळल्यानंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. याबाबत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले असून “ना डरेंगे, ना दबेंगे,” असे फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आल्यानंतर भाजप नेते राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेण्यासाठी घेणे आहेत. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे ट्विट केले आहे. फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मंत्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!,’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत शिवसेनेकडून केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. “शिवसेनेने तमाशा बंद करावा, अन्यथा भाजप राज्यभरात तांडव करेल,” असा इशारा शेलार यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Comment