हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशात चर्चेत असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना रंगत आहे. दरम्यान प्रचार सभेत बोलताना भाजप नेते दिलीप घोष यांची ममता बॅनर्जी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. ममता बॅनर्जी साडी नेसतात पण त्यांचा प्लास्टर लावलेला एक पाय दिसतो. हे काय नाटक आहे? मी कधीही कुणाला अशा पद्धतीने साडी नेसलेलं पाहिलं नाही. (प्लास्टर दाखवायचं असेल, तर) साडीऐवजी बर्मुडा घालावा म्हणजे प्रत्येकाला (प्लास्टर) व्यवस्थित दिसेल”, असं विधान दिलीप घोष यांनी केलं आहे.
घोष यांच्या या विधानावर पश्चिम बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. घोष यांच्या या विधानावर टीएमसीने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून घोष यांचा समाचार घेतला आहे. ‘भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत ममता दीदीने साडी का नेसली? असा सवाल केला आहे. त्यांनी आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असं घोष यांनी म्हटलं आहे आणि या माकडांना वाटतंय ते बंगाल जिंकतील?’ असा सवाल मोईत्रा यांनी केला आहे
ममता बॅनर्जी 10 मार्च रोजी नंदिग्राममध्ये नामांकन अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. अर्ज भरल्यानंतर त्या संध्याकाळी 6 वाजता मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून निघाल्यानंतर त्या गाडीत बसल्या होत्या. यावेळी हल्ला झाल्याने त्यांच्या पायाला मार लागला. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group