हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र भाजपपासून ते केंद्रीय नेतृत्वावर ठाकरेंनी तोफ डागली. ठाकरेंनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून भाजप नेत्यांकडून आता त्यावर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक कार्टून टाईप फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. तीच ‘रडगाणी’ तेच तराणे.. ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
तेच ते… तेच ते…
माकडछाप दंतमंजन,
तोच ‘जोडा’ तेच रंजन
तीच ‘रडगाणी’ तेच तराणे,
‘बाकी मूर्ख’ तेच शहाणेसकाळपासून रात्रीपर्यंत…
तेच ते… तेच ते pic.twitter.com/rtjHHM7Rqf— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 26, 2023
केशव उपाध्येंनी एक ट्विट करत, “तेच ते… तेच ते…माकडछाप दंतमंजन, तोच ‘जोडा’ तेच रंजन, तीच ‘रडगाणी’ तेच तराणे, ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत…तेच ते… तेच ते.” अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच यावेळी त्यांनी एक फोटो शेअर करत ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट!
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 26, 2023
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भलंमोठं ट्विट करत ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. दुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. उद्धवजी, तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात. कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला