हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वतः ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे असंही ते म्हणाले. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनीही आपली करोनाची चाचणी करून घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2020
दरम्यान, आत्तापर्यंतराज्यात अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. तसेच नवनीत राणा, बाळासाहेब पाटील यांसारखे दिग्गज नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.