व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बापरे ! विहिरीत अडकलेला लठ्ठ माणसाला काढू शकले नाहीत मिळून १२ लोक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लठ्ठपणा हा माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण काही वेळेला लोकांच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा लठ्ठपणा काही केल्या कमी होत नाही. लठ्ठपणा चा त्रास अनेक वेळा सहन करावा लागतो. लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. त्यामुळे लठ्ठपणा हा वेळेतच कमी करायला हवा.

लठ्ठपणा मुळे किती त्रास होतो याची एक घटना नुकतीच घडली आहे. हा घटना चीन मधील आहे. घराच्या पाठीमागील एक कोरडी विहीर मुजवण्याचा प्रयत्न काही लोक करत होती. परंतु त्यानंतर विहीर बुजवण्याच्या शेवटच्या काही वेळात एक मनुष्य जबरदस्त त्या विहिरीच्या होल मध्ये फसला. त्याला येताच येत नव्हते म्हणून इतर जणांनी मिळून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हि अयशस्वी झाला. त्या व्यक्तीचे वजन जास्त असल्याने त्याला बाहेर निघत येत नव्हते कि इतरांकडून तो ओढला जाऊ शकत नव्हता.

चीनमधील २८ वर्षीय लिऊला बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेट च्या लोकांना बोलवण्यात आले. १२ जनाची टीम त्याच्या मदतीला आले. परंतु १२५ किलो वजन असलेला हा मनुष्य जागचा हलला गेला नाही. दोरीच्या साह्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न हि अयशस्वी झाला.उलट तो जास्तच आत मध्ये अडकू लागला. हा मनुष्य त्या विहिरीमध्ये लाकडे आणि कचरा भरत होता. पण त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. तो कोणीतरी बाहेर काढेल याची वाट पाहत असलेला फोटो सगळीकडे वायरल झाला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in