गुलाबराव पाटलांवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली; म्हणाले…

0
48
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून भाजपवर नेहमीच टीका केली जाते. दरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यवर घणाघाती टीका केली आहे. तर टीका करताना राणे यांची जीभ घसरली आहे. “सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे,”असे राणे यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते निलेश राणेंनी ट्विट करीत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असे सगळे बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे,” अशी घणाघाती टीका राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here