‘मी ते सोडवणारच’ सांगून मुंबईला निघून जायचं ही ठाकरेंची पद्धत; निलेश राणेंनी साधला निशाणा

0
32
Nilesh rane and uddhav thakarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना व बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व सफारी पार्क तसंच अन्य योजनांचा शुभारंभ करण्यात आला. ‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं ठाम आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांना दिलं.

याशिवाय ‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात औरंगाबाद म्हणून झाली,’ असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाचा सुरुवातीलाच विरोधकांना लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधताचं भाजप नेते निलेश राणे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा लक्ष केलं. निलेश राणे म्हणाले, ” नेहमीप्रमाणे कुठलाही कार्यक्रमाला भाषण करताना त्या जिल्ह्याचे २ प्रश्न ‘मी ते सोडवणारच’ सांगून मुंबईला निघून जायचं हे उद्धव ठाकरे यांची जुनी पद्धत. आज पण औरंगाबाद मध्ये मी पाणी देतो आणि कचरामुक्त करतो सांगून निघून गेले. उद्धव ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण कधीच करत नाही.” असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here