रझा अकादमी अतिरेकी संघटना, दंगली घडवण्यामागे महाविकास आघाडीचाच हात; नितेश राणेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांच्यामागे रझा अकादमी जबाबदार सल्ल्याचा आरोप होत आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकार व रझा अकादमीवर घणाघात टीका केली. “रझा अकादमी अतिरेकी संघटना असून त्रिपुरात मशिद जाळलीच गेली नाही. ही घटना खोटी आहे. राज्यात होणारे हल्ले रझा अकादमीने घडवून आणलेला सुनियोजित कट आहे. राज्यात दंगली भडकावण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात महाविकास आघाडीचाच हात आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, देगलुरचा मोर्चा नुसता मोर्चा नव्हता, हा रचलेला घाट होता, राज्यात ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या तसेच घडवल्या. त्याला रझा अकादमीच जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. तरीही रझा अकादमीच्या एकाही माणसाला अटक होत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर मात्र, मर्दानगी दाखवली जाते. महाविकास आघाडी सरकारने हिंमत असेल तर रझा अकादमीच्या अध्यक्षांना अटक करून दाखवावे.

 

त्रिपुरात घेतलेल्या घटनेचे पडसात महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्र राज्यात एवढी मोठी दंगल होते. आमचा महाविकास आघाडी सरकारवर विश्वास नाही. रझा अकदामी छोट्या यु ट्यूब चॅनलवर छोटे व्हिडिओ प्रसिद्ध करत भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमरावतीत इतरत्र घडलेल्या घटनेबाबत येणाऱ्या काळात आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि एनआयएशी याबाबत चर्चा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

Leave a Comment