“स्वतःची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकावर सध्या नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आर्थिक मदत यावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री,” अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी आज ट्विट केले असून त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी “वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री,” असे लिहले आहे. या पोस्टरमध्ये एका बाजूला मुख्यमंत्री ठाकरे हे एका खुर्चीत बसून कोटी रुपयांची वसुली करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त देण्यात आलेला कमी बोनस, ” असे चित्र आहे.

 

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावरही घणाघाती टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पालिका आयुक्तांना पत्र….

त्याचबरोबर भाजप नेते नितेश राणे यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानाच्या गेली 30 वर्षाच्या लेखाविभागाच्या गलथान कारभाराबाबत, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि भविष्याबाबत तसेच प्रतिष्ठानाच्या खाजगीकरण करण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे.

Leave a Comment