महाविकास आघाडी सरकार चपट्या पायाचे; नितेश राणे यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने केल्या जात असलेल्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत त्रुटी काढण्याचे काम केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे चपट्या पायाचे सरकार हे गेल्या दोन वर्षांपासून आल्यापासून आपल्या राज्याला पनवती लागलेली आहे,” अशी टीका राणे यांनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून या सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर जनतेची फसवणूक केलेली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तीन पक्षाचे हे सरकार आहे. या सरकारने जनतेला अंधारात ठेवले. राज्यात घरात पाणी आले नाही कि हे लोक केंद्राकडे बोट दाखवतात. केंद्रामुळे आरक्षण मिळत नसल्याचे आघाडी सरकारमधील नेते आरोप करीत आहेत. सरकारने आता आरक्षण प्रश्नी भोसले समितीची स्थापना केली आहे. या भोसले समितीने काय दिवे लावले? याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे.”

“ज्या फडणवीसांवर टीका केली जात आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाण यांनी काय काम केले? गावातील सरपंचांना देखील कळते कि ते चव्हाण यांना कळत नाही. आज दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून नुसती आश्वासने दिली जात आहेत,” अशी टीका राणे यांनी केली.

Leave a Comment