औरंगाबाद । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) झालेल्या बलात्काराच्या आरोप कार्यात आले होते. दरम्यान, आरोप करणाऱ्या संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली आणि हे प्रकरण संपले. मात्र, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची बहीण आणि राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आतापर्यन्त बोलणे टाळात होत्या.
पण, अखेर पंकजा मुंडेंनी आज औरंगाबादमध्ये त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताण मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.”तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही”, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
“कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच”, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी म्हणाल्या.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’