परभणी । ”राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही,” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. (Maratha reservation)
राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज नेते औरंगाबाद मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आत आहेत. पंकजा मुंडे यांनीदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण तसेच सरकारवर टीका केली आहे. (Pankaja Munde on Maratha reservation)
“आमदार सतीश चव्हाण यांनी कधीच पदवीधरांचा प्रश्न मांडला नाही. ते कुठेही मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले नाहीत. अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, पुढे मराठा आरक्षणावर बोलताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. असेही त्या म्हणाल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’