हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी बीड जिल्हा दौरा केला. यावेळी त्यांनी महत्वाचे विधान करीत भाजपवर टीकास्त्र डागले. याववेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. पाटलांच्या या दौऱ्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार टीका केली. कॅबिनेटमंत्री पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’. त्यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान देखील पाहिले नाही, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यावर टीका केली. मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. “जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’. त्यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान देखील पाहिले नाही. त्यामुळे या नुकसानीबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चरचा करणार आहे. तसेच नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही करणार आहे.
परळीच्या देशमुख टाकळी येथे आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा,अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। pic.twitter.com/UwqsvbxfOx
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 28, 2021
मंत्री जयंत पाटलांच्या दौऱ्यावर टीका करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण आता या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा बीड दौरा झाला. मात्र, एकाही बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले नाही.