राजू शेट्टी हे आता शेतकरी नेते राहिले नाहीत ; प्रविण दरेकरांचा टोला

Darekar and Shetty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर खडसून टीका केली आहे. राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांना राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची शेतकरी नेते ही ओळख पुसली गेली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे असेही प्रविण दरेकर म्हणाले.

तसेच राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आहे. यासाठी आता राजू शेट्टी काय करतात, हे पाहावे लागेल, असे दरेकर यांनी म्हटले.

आम्ही विरोधात आहोत तर सत्ताधारी आमचे कौतुक थोडी करणार आहेत? सरकारला भाजपची भीती वाटते. भाजपवर टीका केल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही. आमच्यावर टीका केली नाही तर सरकारकडे सांगण्यासारखे काय आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’