मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

सत्तेसाठी भाजप कुठलीही तडजोड करू शकतो; भाजप नेत्याचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकतो अशा शब्दात टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजप मार्गदर्शक मंडळाचे सदस्य हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी आज केली. शांता कुमार यांचं आत्मकथन असलेल्या ‘निज पथ का अविचल पंथी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी … Read more

तेव्हाच आमच्याशी “लव्ह मॅरेज” केलं असतं तर आज युतीची सत्ता राहिली असती ; गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहो राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी लगेच ‘लव्ह मॅरेज’ केलं असतं तर आज राज्यात सरकार राहिलं असतं, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला.केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजने अंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाउसच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार … Read more

भाजपच्या महिला नेत्याला 100 ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक

कोलकाता | कोलकाता पोलिसांनी आज (19 फेब्रुवारी) रोजी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याच्या भाजपा महासचिव पामेला गोस्वामी आणि त्यांच्या मित्राला अटक केली आहे. त्यांच्यावर ड्रग्स बाळगण्याचे आरोप आहेत. त्यांच्याकडे 100 ग्रॅम कोकेन सापडल्याचे बोलले जात आहे. दोघे बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या ड्रग्स विक्री व्यवसायामध्ये सामील असल्याचे कोलकत्ता पोलिसांनी म्हटले आहे. आज … Read more

कराड नगरपालिका भाजपा स्वबळावर सर्वच जागा लढविणार – भाजप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व 29 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांचे बूथ संपर्क अभियान घेतले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली.यावेळी मुकुंद चरेगांवकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे,रूपेश मुळे … Read more

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही ; फडणवीसांच्या विधानाने राजकीय खळबळ

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आमंत्रित माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता फार काळ विरोधात आपण बसणार नाही असे विधान केले. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात माणसे रस्त्यावर मरून पडत असताना फक्त भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर होते आणि सल्ला … Read more

भाजपच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह प्रकारावर रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या भाजपच्या वेबसाईटवर  नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, भाजपकडून ही चूक झाली नसावी, असा दावाही त्यांनी केला. भाजपच्या संकेतस्थळाच्या … Read more

सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

जनाब देवेंद्र फडणवीस ; रोझा-इफ्तारचं ‘ते’ पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’ वरील उर्दू मजकुरावरून भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधताना पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु आता सोशल मीडियावर दावत- रोझा- इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. … Read more

अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाणार ?? आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

aathawale ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा खळबळजनक दावा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान आठवलेंच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद … Read more