ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेला भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले असून शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा असून हा आयोगच बरखास्त करण्यात यावा. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोगाची नेमणूक केली जावी, अशी मागणी काल उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आयोगाच्या या प्रकाराबद्दल आपण गुन्हाही दाखल करू, असा थेट इशाराच ठाकरेंनी दिला. त्यानंतर त्यांच्या या मागणीला भाजपमधून पाठिंबा मिळाला आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्रिट केले आहे

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा देत एक ट्रिट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे कारण आयोगाचे काम आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून अनेक प्रकारचे राजकारण केल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत ठाकरेंना पाठींबा दिला आहे. स्वामी हे ५ वेळा लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९०-९१ या काळात केंद्र कायदा व न्याय मंत्री होते.

काय होती उद्धव ठाकरे यांची मागणी

आपले पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यांकडून सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे. आता सोमवारी ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे म्हणाले,की निवडणूक आयोगाने एवढे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र मागितले. एवढे गठ्ठे दिले. पण त्यानंतर आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही. मग एवढा खर्च कशाला का करायला लावला.आता निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नाही. शिवधनुष्य रावणाला पेललं नाही. ते मिंध्यांना काय कळणार आहे. चिन्हं दिलं तर शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे असल्याचे ठाकरेंनी म्हंटले आहे.